Saturday, March 29, 2014

घरट ------------


हि नाही कविता, नाही कोणती कथा .
आहे एका चिमणीची, फक्त एक व्यथा .
गावाच्या वेशीवर, एक पडक घर होत .
आत जाण्यासाठी, एक फुटक कौल होत .
रोज गवत घेऊन, घरामध्ये यायचं .
आपल्यासाठी नवीन, घरट आत्ता बनवायचं .
पिल्लं आपली सुरक्षित, राहतील या घरात .
पाऊस आता येऊन दे, कितीही जोरात .
काही दिवसांनी आता , सवय पण झाली .
पिल या घरात, बराच काळ राहिली .
उन्हाळा आता, संपत आला होता .
पावसाळा सुद्धा , सुरु झाला होता .
पण एकदा काही, वेगळंच घडल .
माणसाने घर, विकतच घेतलं .
घरामध्ये आता, नव्या वस्तू आणल्या .
भिंतींना पण त्याने, फळ्या चार टांगल्या .
मालकाने घर, स्वच्छ केल होत .
फुटक कौल, नव बसवलं होत .
भिंतींना सुद्धा , नवा रंग दिला .
छताला पण आता , पंखा नवा टांगला .
चिमणीचा पंख, पंख्यात अडकला .
घरट्याच्या काठ्या, कचर्यात पडल्या .
मालकाची मुलं, घरात येऊन राहिली ,
चिमणीची पिल्लं, कुणीच नाही पहिली .

मंदार .......................

माणसांच्या मुलांनी जंगलं सारी तोडली 
चिमणीच्या पिल्लाना घरं नाही राहिली 

No comments:

Post a Comment