Saturday, January 17, 2015

शेकोटी

चल जाऊ पुन्हा अंधारात
आणि करू आठवणींची शेकोटी
मिळेल त्या निखाऱ्यातून उब
आणि सुटेल थोडी चाकोरी
……………….
पण
पण सर्व असतील का माहित नाही
सर्व जमतील का माहित नाही

मन दार …………

Saturday, March 29, 2014

भोक

फाटलेल्यात पाय घालुन
अनेक चिंध्या करायच्या
आधिच भोक होत बोलुन
वेळ मारुन न्यायच्या
पण ............
पण खरा कलाकार तोच आहे
जो फाटलेल्याला शिवतो
आणि शिवलेल कधि कळु नये
याचेच प्रयत्न करतो
.............
पण पुन्न्हा भोक पडल तर
.............
इथेच
इथेच खर गुपित असत
भोक नेहमिच पडत
कस पडल माहित नाहि
हेच नेहमि नडत

मन दार ............

शर्यत

या शर्यतित कधिच भाग घेतला नाहि मि
ना जिंकण्याचि हौस ना हारण्याचि इछा
फक्त शर्यत संपते कधि याचि वाट बघतोय मि
या शर्यतित फक्त धावतोय मि फक्त धावतोय मि
मन दार ........

तिन एक्के

पत्त्यात तिन एक्के तेव्हाच येतात
जेव्हा जुगारात काहिच लावलेल नसत
नाहितरि उरवरित खेळात पण
बाकि अस काहिच राहिलेल नसत

मन - दार ..........


......................................................

अशी एक शांतता



मैफिलीत बसलो मी 
आवाज न करता 
माझ्या शांततेचा आवाज 
फारच मोठा होता 

मंदार---------------

कविमन ...

आता पाउस आल्यावरच येणारका कविता ........................
का सुकुन जात हे कविमन उन्हाळ्यात
आणि राख होते शब्दांचि उन्हात....
पुसून जातात शब्द घामाच्या धारेत
आणि रहातात फक्त वहिचि अबोल पान...............
जि विचारत असतात आता काय......................
…………………………………
आता काय ..हाच अंत आहेका कविमनाचा....
........................................
पण त्या पानांना कुठे माहित
पुन्हा येतिल पाण्याचे थेंब............
पुन्हा येयिल हिरवळ ......................
पुन्हा येतिल फुलं, पक्षि,.......
आणि क्षितीजावर दिसतिल नवे शब्द.................
…………………………………
…………………………………
पण कविमना
म्हणुन विसरुन  जाउ  नको तु आजच्या उषम्याला
त्यावरहि कर एखादी कविता
किवा कमीत कमी दोन ओळी


मन-दार .....................

मित्र ..............

ओढून रेघोट्या कागदावरती, कागद फाटून गेला .
न जाणे मझ्यामधला, कवी कुठेतरी  गेला .
शोधून त्या गड्याला, पुन्हा पकडून आणला .
एक गद्य संपल तरी, ओळखत नाही मजला .
ग्द्यावरुन आता ओळी, पद्यावारती आल्या .
खांद्यावर हात ठेऊन विचारी, ओळखतोका मित्राला .
मंदार ---------------

जून ....................

नवीन काय असत फक्त वर्ष
…………. बाकी सर्वा जुनाच खर्च
नवीन घरात नवा रंग
…………. रहाण्याचे मात्र जुनेच बंध
नवीन असत बळाच रडण
…………. त्याला मिळत जुनच खेळण
नव्या रस्त्यावर नवी गाडी
…………. प्रदूषणाची हवा जुनी
नवीन असत मंत्र्याच नाव
…………. भ्रष्ट्राचाराचा जुनाच गाव
घडल जे सार नव 
 …………. दडल ते आठवणीतल जून
……………………………
 ……………………………
घेतलेलं असत सार नव
…………. जे राहून जात तेच जून  
 मन-दार …………….

11

नभ डोंगर माथ्यावर,
थवा पोचला तिथवर ,
स्पर्श नभाचा घेऊन ,
पुन्हा आली जमिनीवर .
मन झाल हे उनाड ,
पिल्लू नव्हते जवळ ,
तवा पिलासाठी खाऊ ,
घेतला जमिनीवर.
पोहोचली घरट्यात ,
घास भरवला एक ,
तन नभात फिरून ,
मन होते पिलावर .

मंदार ---------------

-------पु. ल. आदर--------



रहात सोसायटीत असलो 
तरी बटाट्याच्या चाळीची  सर 
लोकल ने कामावर जातो 
पण चिंता करतो वश्वाची 
महिन्याचा पगार पुरत नाही 
तरी आनंदावर वहिवाटीचा हक्क 
एखाद्या मंत्र्याने घोटाळा केला 
तर त्याला फक्त फुल्या फुल्या फुल्या 
महागाईने त्रास झाला 
तरी आमच आपल मनात 
अशा प्रकारे असतात 
पु . ल. अजूनही आमच्या जीवनात

मंदार -----------