Thursday, December 22, 2011

---- सेवक साहेब ----

निवडणूक करून जनता,
एक व्यक्ती गणते.
त्यांचीच कामं करण्यासाठी,
त्यालाच पैसा चारते.

जनतेच्या सेवकांना,
जनताच साहेब म्हणते.
अशा प्रकारची लोकशाही,
आपल्या देशात चालते.

साधी भोळी जनता ,
एकदाच पेटून उठते
जुना सेवक काढून
नवा (साहेबच) आणते

मंदार-------

Sunday, December 18, 2011

हा हा हा

हसून बघा कधी वाटल तर
पण आधी बघा रडणार्या कडे जमल तर
असतात काही स्वप्न तुटलेली
जोडता येतात आपली नसलेली
काही अवघड नसत अस करणं
चांगल नसत फक्त स्वार्थ धरणं
स्वप्न जोडताना आनंदहि होतो
त्या मुळे माणूस आपोआप हसतो
मंदार................

Thursday, October 13, 2011

चावी

मी निघताना सर्व बंद केल होत
दार घट्ट लावलं होत
कुलूपही घातलं होत
कोणी आत जाऊ नये
काही चोरी करू नये म्हणून
पण आता माझी चावीच हरवली आहे
आणि मीही आत जाऊ शकत नही
................कोणाला मिळाली का मझ्या मनाची चावी?? थोडी गंजली आहे ती .

मंदार ........

दिनचर्या ....

सकाळी उठायचं कामावर जायचं
संध्या काळी घरी जायचं
पुन्हा मित्राना भेटायचं
घरी tv पहायचा
रात्री जेऊन झोपून जायचं
.......मग मनाशी बोलायचं कधी ??

मंदार..............

द्खी

आपणच असतो आपल्या दुखाच कारण
कारण आपण ठेवत असतो अपेक्षा, इच्छा,
आणि अस लिहित असताना पुन्हा विचार करतो
कि का ठेऊ नये अपेक्षा आणि पुन्हा द्खी होतो आपण

मंदार .........

सर्व जून...........

आता वहीची पानही वाट बघत असतात माझी कधी कधी
मी केव्हा माझ्या पासून जातो त्यांच्या कडे याची
पण मी जात नही वही कडे कधी कधी
कारण मला जाणीव आहे त्या वहीतच तर सर्व जून आहे याची

मंदार................

अनोळखी....................

लिहिलेल्या कविता पुन्हा वाचताना ,
मला आठवतही नाही कधी कधी संधर्भ .
कळत नसतो कधी कधी अर्थ .
तेव्हा मीच मला अनोळखी वाटू लागतो .
मग पुन्हा करतो मी नव्या कविता
.........पुन्हा कधी अनोळखी होण्या साठी

मंदार .............

वाट

रेनकोट घातल्याने, छत्री घेतल्याने
कोठेही आडोसा घेतल्याने , किवा पळून गेल्यानेही
मी वाचू नही शकत या वादळा पासून
त्या मूळे मी काहीच करत नही यातलं
......................फक्त वाट बघत बसतो
मंदार ...................

ओझी...............

साठवून ठेवली आहेत मी आठवणींची बोचकी .
नंतर पुढे जाऊन ओझी नको का वाहिला .
पण भीती वाटते .................
त्या ओझ्याने गुदमरून तर नही ना जाणार मी .
म्हणूनच कधी कधी काही आठवणी विसरून जातो मी.......... मुद्दामून .

मंदार ...................

चहा

स्वतःच ओतून ठेवलेला चहा
आपण पितो कधी कधी
कधी गरम असतो, तर कधी थंड
कधी छान असतो , तर कधी पांचट
.................मनाचंही असंच असत ना ?

मंदार .................

पुढे काय ?....

मी लांब बसलो आहे एकटाच
...............आणि दुरूनच बघताहेत माझ्याकडे
माझ नशीब, माझ दैव, माझ अस्तित्व, माझी स्वप्न ......... आणि मी स्वतः हि
पण ..............पुढे काय ?

मंदार .................

वेड ................

मनात आल तर, हसतो मी कधी कधी .
नाहीतर नुसता, बघतो मी कधी कधी .
मित्राना कळत नही माझ हे वेड .
मनात त्यांच्या वाकून, बघतो मी कधी कधी .

मंदार ................

ओझ

मनावरच ओझ मी ,
काढून ठेवलं होत
नशिबाने माझ्या ते .
लपून पाहिलं होत .
हसण माझ मी
जपून ठेवलं होत
आपल्याच व्यक्तींना
वाटून टाकल होत

मंदार ..........

म्हणजे .....

जेव्हडी भरकट जास्त, तेव्हडी कविता मोठी.
जेव्हडे विचार जास्त, तेव्हडी कविता मोठी.
जेव्हडा एकटेपणा जास्त, तेव्हडी कविता मोठी .
आज सर्व आहे मस्त , आज बस चार ओळी.
मंदार ....................

जिवंत

फुटलेल्या मडक्यातल, पाणी सुद्धा पिऊ .
महाग झाल पेट्रोल, तर पाइच घरी जाऊ .
मिळत नाही ग्यास, तर चुलीवरच खाऊ .
तुम्ही काहीही करा, पण आम्ही जिवंत राहू .
तुम्ही काहीही करा, पण आम्ही जिवंत राहू
मंदार ...........

The water world

इथे फक्त पाणीच पाणी
नाही जमिनीचा तुकडा
स्वतंत्र असू आपण सारे
कशाला देशांचा मुखडा
( The water world )
मंदार ..........

प्रदेश

मी चालत होतो ज्या मार्गावर
तो मार्गच मला माहित नव्हता
मी पोहोचलो होतो ज्या ठिकाणावर
तो प्रदेशच मला अनोळखी होता
मंदार ..........

मित्र

मी शोधत होतो ज्याना
ते दिसले नाही मला
जो भेटला होता मित्र
मीच पाहिलं नव्हत त्याला
मंदार .........

जवळपास

मी बसतो एकांतात जेव्हा
कोणी नसत मैफिलीत तेव्हा
मी असतो जवळपास कुठेतरी
पण दिसतनाही कुणालाच कधी
मंदार -------

आम्ही..............

घाला आता आम्हाला स्वप्नांचं पांघरून
गेलो आता आम्ही समस्येत चेंगरून
वेडे झाले सारे समस्या सांगून
राज्यकरते बसलेत खुर्चीवर पेंगून ...................
आम्ही ढेकुण, आम्ही ढेकुण, आम्ही ढेकुण,
द्या आम्हाला फेकून, फेकून, फेकून,

मंदार ...............

तयारी

कवितेंचा डोंगर मझ्या ब्लोग वर ओततो .
पेंटिंग चा मुलामा त्यावर चढवतो .
फोटोग्राफीचे छप्पर त्यावर लाऊन ,
नवीन परिक्षेसाठी मी तयारी करतो .

मंदार .........

राख

अग माझ प्रेम होत तुझ्यावर
माझी आठवण तुला येईल का ?
दिली आहुती तुझ्या प्रेमात
थोडी राख तरी नेशील का ?

मंदार ........

Friday, October 7, 2011

तिथेच उभा

मी गेलो होतो दूर कुठे
विसरलो होतो सार
आणि पुन्हा येऊन पाहिलं तर
मी पाहत होतो मला तिथेच उभा
पण .............कशासाठी
मंदार ......................

मी जगतो आहे

मी जगतो आहे
अस वाटत मला कधी कधी
म्हणून आरशात जाऊन
श्वास घेऊन बघतो कधी कधी
आरशाला सुद्धा कंटाळा आला असेल
म्हणून तो सुद्धा फुटतो कधी कधी
मंदार .............

अदृश्य

मी आलो आहे पुन्हा त्याच ठिकाणी
मला आसरा मिळेल का ?
माझ शरीर नाही माझ्या बरोबर
मला बघू शकाल का ?
मंदार .................................

मी थांबलो आहे

मी थांबलो आहे जिथे
तिथे पाऊसच नाही
आणि जिथे पाऊस येतो
तिथे मी थांबतच नाही
मंदार...............

कंटाळा

हल्ली भांडण्याचा सुद्धा कंटाळा आलाय
नाहीतर आधी पेनात शाई भरावी लागत होती लिहिताना
मंदार ..............................

सूर्यनमस्कार

मी सूर्याला सकाळी
मावळायला सांगितलं होत
तर तो खरोखरच
संध्याकाळी मावळला होता
मंदार .....................

वादळांची नाव

मी थांबलो होतो जिथे
तिथे वादळ खूप आली
त्या वादळांना आम्ही
वेग वेगळी नाव दिली
मंदार ..............

कोपरखळी

आपण पुन्हा एकदा तेच केले
विचारांच्या जागी शब्दाना नेल
...................शब्दाचा दिला बळी
...................विचारांची फक्त कोपरखळी
मंदार ......................

ओंजळीतली फुल

ओंजळीतली फुल देवाला वाहिली
देवाने फुलं कधीच नाही पहिली
ठेवलेली फुल हळु हळु सुकली
देवासाठी पुन्हा नवी फुल घेतली
मंदार .................

फसवणूक ..............

मी मलाच फसवायला
लपून बसलो होतो
समोर उभ्या अडचणीला
गोंधळून गेलो होतो
दूरवर कुठेतरी
वादळ आल होत
बघून त्याला समोर
पळून गेलो होतो
मंदार ................

डेटा

साईन इन करून, गुगल मध्ये घुसलो .
शब्दांच्या जागी, मीच जाऊन बसलो.
......................पेनाच्या जागी. कीबोर्ड वापरला .
......................डेटा मात्र मी, मनातलाच उतरवला .
मंदार ...........................

नवी वही

पेनातली शाई, आज पुन्हा संपली .
वहीवर सुद्धा, धूळ फार जमली .
......................धूळ झटकताना, वही आज फाटली .
......................भरून काढण्यासाठी, नवी वही घेतली .
मंदार .................

फटके

शब्द लिहून स्वतःचे
मी मलाच फटके देतो
सांगून सर्वाना ते
स्वतःचेच लचके तोडतो
हा हा हा ...

मंदार ..............

Thursday, October 6, 2011

पत्त्यांच घर

मी पत्त्यांच घर, कालच घेतलं होत.
त्या घरात माझ, गाठोड ठेवलं होत.
दूरवरून कुठून, वादळ आल होत.
वादळात पत्त्यांच घर, ...............उडून गेल होत.
मंदार .......................

पैसा

मी फाटलेल्या शर्टाला
खिसा समजून वागतो
आणि दुकानात जाऊनी
त्यात हात घालतो
हा हा हा ...
मंदार ................

त्यामुळे

पाऊस सुद्धा पडत नाही अंगणात
नाहीतर आधी चप्पल घालावी लागत होती चालताना
शब्द सुद्धा राहिले नही ओठात
नाहीतर आधी पाणी प्यावं लागत होत बोलताना
मंदार ...............................

काहीच नाही

मी उभा आहे ज्या शहरात,
तिथे लोकच नाहीये .
मला जायचं आहे ज्या गावात
तिथे जागाच नाहीये
मंदार ................

मी भिजतो

ती पावसात भिजली
तर मी तिला रागवतो
आणि ती जर रुसून बसली
तर मीच पावसात भिजतो
मंदार ................

थेंब

एक थेंब पावसाचा
ओंजळीत घेतला
थेंब वाचवता वाचवता
हात अक्खा भिजला
मंदार ................

स्वप्न

माझ स्वप्नांच जहाज,
अस्तित्वाच्या तलावात बुडत.
आणि माझ स्वप्न,
एक नवीन जहाज उभं करत.
मंदार ................

लेखक ..........

तुटलेली नीप नवीन बसवली
रिकाम्या पेनात पूर्ण शाई भरली
लिहिण्यासाठी मी नवी वही घेतली
वर श्री लिहून जुनीच देणी लिहिली
मंदार ..............

महागाई

मी शब्दांनी सरकारला फटके देतो
तो महागाईने माझे लचके तोडतो
मी त्यांच्या विरुद्ध नेहमी उभा राहतो
तो चिमटीत धरून मला फेकून देतो
मंदार ..............

चुल

आईच्या बोटाचे ठसे भाकरिवर उठतात
चुलितले निखारे कजव्यां सारखे दिसतात
पावसाळ्यात चुल मला खुपच छान वाटते
कारण ग्यासचे सिलेंडर खुप महाग मिळते
मंदार ..................

माझेच प्रश्न

एकावर एक असे
खूप ढग जमले होते
मला का जणू ते
माझेच प्रश्न वाटले होते
मंदार ..................

कमळाच्या ओंजळीत

बसलो होतो एकदा
तुझ्या आठवणीत
भुंगा फसला होता जसा
कमळाच्या ओंजळीत
मंदार ..................

तुला पाहता पाहता

तुला पाहता पाहता
दिवस उगवतो
तुला पाहता पाहता
दिवस मावळतो
तू समोर नसलीस
तरी मी तुला कसा पाहतो
मंदार ..................

सर्व संपलेलं असत

समोर उभ्या असलेल्या
वादळाला आपण विचारलं
कि तू केव्हा येणार
तर तो फक्त हसतो
आणि त्याच हसण संपे पर्यंत
सर्व संपलेलं असत
मंदार ..................

Tuesday, October 4, 2011

सावरलो

चिखलात पाय ठेवताना
आज मी घसरलो
पडत होतो कमळावर
पण त्या आधीच सावरलो
मंदार ..............