Thursday, October 13, 2011

चावी

मी निघताना सर्व बंद केल होत
दार घट्ट लावलं होत
कुलूपही घातलं होत
कोणी आत जाऊ नये
काही चोरी करू नये म्हणून
पण आता माझी चावीच हरवली आहे
आणि मीही आत जाऊ शकत नही
................कोणाला मिळाली का मझ्या मनाची चावी?? थोडी गंजली आहे ती .

मंदार ........

दिनचर्या ....

सकाळी उठायचं कामावर जायचं
संध्या काळी घरी जायचं
पुन्हा मित्राना भेटायचं
घरी tv पहायचा
रात्री जेऊन झोपून जायचं
.......मग मनाशी बोलायचं कधी ??

मंदार..............

द्खी

आपणच असतो आपल्या दुखाच कारण
कारण आपण ठेवत असतो अपेक्षा, इच्छा,
आणि अस लिहित असताना पुन्हा विचार करतो
कि का ठेऊ नये अपेक्षा आणि पुन्हा द्खी होतो आपण

मंदार .........

सर्व जून...........

आता वहीची पानही वाट बघत असतात माझी कधी कधी
मी केव्हा माझ्या पासून जातो त्यांच्या कडे याची
पण मी जात नही वही कडे कधी कधी
कारण मला जाणीव आहे त्या वहीतच तर सर्व जून आहे याची

मंदार................

अनोळखी....................

लिहिलेल्या कविता पुन्हा वाचताना ,
मला आठवतही नाही कधी कधी संधर्भ .
कळत नसतो कधी कधी अर्थ .
तेव्हा मीच मला अनोळखी वाटू लागतो .
मग पुन्हा करतो मी नव्या कविता
.........पुन्हा कधी अनोळखी होण्या साठी

मंदार .............

वाट

रेनकोट घातल्याने, छत्री घेतल्याने
कोठेही आडोसा घेतल्याने , किवा पळून गेल्यानेही
मी वाचू नही शकत या वादळा पासून
त्या मूळे मी काहीच करत नही यातलं
......................फक्त वाट बघत बसतो
मंदार ...................

ओझी...............

साठवून ठेवली आहेत मी आठवणींची बोचकी .
नंतर पुढे जाऊन ओझी नको का वाहिला .
पण भीती वाटते .................
त्या ओझ्याने गुदमरून तर नही ना जाणार मी .
म्हणूनच कधी कधी काही आठवणी विसरून जातो मी.......... मुद्दामून .

मंदार ...................

चहा

स्वतःच ओतून ठेवलेला चहा
आपण पितो कधी कधी
कधी गरम असतो, तर कधी थंड
कधी छान असतो , तर कधी पांचट
.................मनाचंही असंच असत ना ?

मंदार .................

पुढे काय ?....

मी लांब बसलो आहे एकटाच
...............आणि दुरूनच बघताहेत माझ्याकडे
माझ नशीब, माझ दैव, माझ अस्तित्व, माझी स्वप्न ......... आणि मी स्वतः हि
पण ..............पुढे काय ?

मंदार .................

वेड ................

मनात आल तर, हसतो मी कधी कधी .
नाहीतर नुसता, बघतो मी कधी कधी .
मित्राना कळत नही माझ हे वेड .
मनात त्यांच्या वाकून, बघतो मी कधी कधी .

मंदार ................