Saturday, March 29, 2014

11

नभ डोंगर माथ्यावर,
थवा पोचला तिथवर ,
स्पर्श नभाचा घेऊन ,
पुन्हा आली जमिनीवर .
मन झाल हे उनाड ,
पिल्लू नव्हते जवळ ,
तवा पिलासाठी खाऊ ,
घेतला जमिनीवर.
पोहोचली घरट्यात ,
घास भरवला एक ,
तन नभात फिरून ,
मन होते पिलावर .

मंदार ---------------

-------पु. ल. आदर--------



रहात सोसायटीत असलो 
तरी बटाट्याच्या चाळीची  सर 
लोकल ने कामावर जातो 
पण चिंता करतो वश्वाची 
महिन्याचा पगार पुरत नाही 
तरी आनंदावर वहिवाटीचा हक्क 
एखाद्या मंत्र्याने घोटाळा केला 
तर त्याला फक्त फुल्या फुल्या फुल्या 
महागाईने त्रास झाला 
तरी आमच आपल मनात 
अशा प्रकारे असतात 
पु . ल. अजूनही आमच्या जीवनात

मंदार -----------

हा ....

हाबघा हा आज पण आला
काम धंधे नाही का याला
येतो आणि भिजवतो मला
आणि पुन्हा चिडवतो मला
हाबघा याने राडा केला
कोणीतरी समजावा याला
गाड्यापण बंद केल्या
शाळेलाहि सुट्या दिल्या
हाबघा हा वेडा झाला
मनसोक्त आज आला
धो धो नुसताच पडला
आणि पुन्हा निघून गेला......................
.......................काय वेड लागलंय का याला
.......................काय वेड लागलंय का याला
मंदार .................

हा लपलेला


हा असतो दडून बसलेला
नसतोच कुठे गेलेला
कोसळतो बाहेर आल्यावर
हा सुकलेला कि भिजलेला
..................हा असतो अधीर झालेला
..................बघतो हळूच लपलेला
..................तुटून पडतो अंगावर
..................थेंबा थेंबा ने भरलेला
हा ढगातून कोसळलेला
हा छपरातून ओघळलेला
हा लपतो पुन्हा पडल्यावर
हा मनामध्ये पाझरलेला
मंदार ...................

घरट ------------


हि नाही कविता, नाही कोणती कथा .
आहे एका चिमणीची, फक्त एक व्यथा .
गावाच्या वेशीवर, एक पडक घर होत .
आत जाण्यासाठी, एक फुटक कौल होत .
रोज गवत घेऊन, घरामध्ये यायचं .
आपल्यासाठी नवीन, घरट आत्ता बनवायचं .
पिल्लं आपली सुरक्षित, राहतील या घरात .
पाऊस आता येऊन दे, कितीही जोरात .
काही दिवसांनी आता , सवय पण झाली .
पिल या घरात, बराच काळ राहिली .
उन्हाळा आता, संपत आला होता .
पावसाळा सुद्धा , सुरु झाला होता .
पण एकदा काही, वेगळंच घडल .
माणसाने घर, विकतच घेतलं .
घरामध्ये आता, नव्या वस्तू आणल्या .
भिंतींना पण त्याने, फळ्या चार टांगल्या .
मालकाने घर, स्वच्छ केल होत .
फुटक कौल, नव बसवलं होत .
भिंतींना सुद्धा , नवा रंग दिला .
छताला पण आता , पंखा नवा टांगला .
चिमणीचा पंख, पंख्यात अडकला .
घरट्याच्या काठ्या, कचर्यात पडल्या .
मालकाची मुलं, घरात येऊन राहिली ,
चिमणीची पिल्लं, कुणीच नाही पहिली .

मंदार .......................

माणसांच्या मुलांनी जंगलं सारी तोडली 
चिमणीच्या पिल्लाना घरं नाही राहिली 

टाइम पास

वेळ जाण्यासाठी -------------

जर मी तुझ्या प्रेमात पडलो
अस वाटत असेल तर
तसच समज अणि
दे एक शिक्षा प्रेमात पडण्याची 
..................................
..................................
नाही तरी वेळ जाण्यासाठी
काही टाइम पास उरला नाही 
कमित कमी वेळ तरी जाईल
शिक्षा भोगता भोगता........

मंदार -------------

आठवण पावसाची

आठवण पावसाची, उन्हाळ्यात येते .
सुकलेल्या गवाताचिही, आर्त हाक कळते .
नदीवर जउनिही, रिकामीच मडकी .
भरलेल्या डोळ्यातील, पाणीही सुकते .


मंदार-------------------

मी पण तसाच आहे

आठवतो का आईने दिलेला मार ,
का आठवतो फक्त प्रेयसीने दिलेला नाकार .
आठवते का वडिलानी दिलेली मिठी ,
का आठवते फक्त वाढदिवसात आलेल्या भेटी .
जीव जळतो का आईच्या नसण्या ने ,
का फक्त वाटत दुखः गाडी नसल्याने .
फोटो असतो का वडिलांचा पैशाच्या पाकिटात,
का फक्त असतात क्रेडिट कार्ड बिलांच्या हिशोबात .
................  पण जाउन दे मी पण तसाच आहे ,
................  पैशाच्या पाकिटासाठीच फक्त माझा खिसा आहे .

मंदार -------------------

Thursday, December 22, 2011

---- सेवक साहेब ----

निवडणूक करून जनता,
एक व्यक्ती गणते.
त्यांचीच कामं करण्यासाठी,
त्यालाच पैसा चारते.

जनतेच्या सेवकांना,
जनताच साहेब म्हणते.
अशा प्रकारची लोकशाही,
आपल्या देशात चालते.

साधी भोळी जनता ,
एकदाच पेटून उठते
जुना सेवक काढून
नवा (साहेबच) आणते

मंदार-------

Sunday, December 18, 2011

हा हा हा

हसून बघा कधी वाटल तर
पण आधी बघा रडणार्या कडे जमल तर
असतात काही स्वप्न तुटलेली
जोडता येतात आपली नसलेली
काही अवघड नसत अस करणं
चांगल नसत फक्त स्वार्थ धरणं
स्वप्न जोडताना आनंदहि होतो
त्या मुळे माणूस आपोआप हसतो
मंदार................